वेज आलू टिक्की बर्गर | Veg Burger Aloo Tikki Burger Indian Recipe | Mumbai Jumbo Burger

बर्गर:
हे भारतीय आलू टिक्की आणि मऊ बन यांचे एक मधुर संयोजन आहे.  हे एक व्युत्पन्न स्नॅक फूड आहे जे भारतीय परंपरेला नवीन वेस्टर्न फास्ट फूडच्या क्रेझसह जोडते.





साहित्य :-
२ बर्गर पाव
३ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
१ वाटी बारीक चिरलेला कोबी
१ गाजर किसलेला
बारीक चिरलेली कोथींबीर
बारीक चिरलेला कांदा
६ हिरव्या मिरच्या
१० लसूण पाकळ्या
अर्धा इंच आल
१ चमचा एव्हरेड लाल तिखट मसाला
१ चमचा धना जीरा पावडर
अर्धा चमचा हळद
टोमॅटो केचप
मियानिझ
मीठ ( चवीनुसार )
कढीपत्ता
हिंग
२ चीज स्लाइस
१ गोल कापलेला कांदा
१ गोल कापलेला टोमॅटो
२ कोबीचे पान



कृती :-
१) मिरची आल लसूण ची मिक्सर ला पेस्ट करून घ्या.
२) गॅस चालू करा आणि त्यावर तवा गरम करायला ठेवा, तवा गरम झाल्यावर त्यात तेल घाला, तेल गरम झाल्यावर त्यात कांदा कढीपत्ता घालून २ मिनिटे फ्राय करून घ्या.
३) २ मिनिटानंतर हिंग, आल, लसूण आणि मिरची ची पेस्ट टाकून चांगले फ्राय करुन घ्या.
४) मग त्यात हळद, धना - जीरा पावडर, एव्हरेस्ट लाल तिखट मसाला घालून मसाले परतून घ्या.
५) आता उकडून कुस्करून घेतलेला बटाटा, किसलेला गाजर, बारीक चिरलेला कोबी , मीठ, कोथिंबीर घालून भाजी  ५ मिनिटे शिजवून घ्या.
६) शिजवलेली भाजी थंड करून घ्या. भाजी थंड झाल्यावर त्याच्या टिक्या बनवून घ्या .
७) गॅस चालू करा आणि त्यावर तवा गरम करायला ठेवा, तवा गरम झाल्यावर त्यात तेल घाला आणि तयार केलेल्या टिक्या फ्राय करुन घ्या.
८) बर्गर पाव घ्या त्यावर टोमॅटो केचप पसरावा त्यावर व्हेज टिक्की ठेवा मग चीझ स्लाइस ठेवा आणि त्यावर गोल कापलेला कांदा, गोल कापलेला टोमॅटो घाला त्याचबरोबर मियोनिझ वरून पसरवा आणि त्यावर बर्गर पाव लावा.
९) बर्गर तयार आहे.


In English


Burger 




Ingredients : -
2 burger pav
3 medium sized boiled potatoes
1 cup finely chopped cabbage
1 grated carrot
Finely chopped coriander leaves
Finely chopped onion
6 green chillies
10 garlic cloves
Half an inch ginger
1 tbsp everest Red Chili Masala
1 tablespoon coriander cumin powder
Half a teaspoon of turmeric
Tomato ketchup
Mayonnaise
Salt (to taste)
Curry leaves
Asafoetida
2 cheese slices
1 round chopped onion
1 round chopped tomato
2 cabbage leaves

 Method : -
1) Paste all the green chilli, ginger, garlic in a mixer.
2) Turn on the heat and keep the frying pan hot. When the frying pan is hot, add oil. When the oil is hot, add finely chopped onion, curry leaves and fry for 2 minutes.
3) After 2 minutes add asafoetida, ginger, garlic and green chilli paste and fry well.
4) Then add turmeric, coriander-cumin powder, Everest red chili masala and saute it well.
5) Now add boiled mashed potatoes, grated carrot, finely chopped cabbage, salt, coriander leaves and cook for 5 minutes.
6) Cool cooked vegetables.  When the vegetables are cool, make their tikkis.
7) Turn on the heat and keep the frying pan hot. Once the frying pan is hot, add oil and fry the prepared tikkis.
8) Take burger bread, spread tomato ketchup on it, put veg tikki on it, then put cheese slice on it, add chopped onion, chopped tomato on it, spread it on mayonnaise and put burger bread on it.
9) The burger is ready.

 
थोडे नवीन जरा जुने