Diwali Faral | मैद्याच्या खुसखुशीत गोड शंकरपाळ्या | How to make shankarpali

मैद्याच्या गोड शंकरपाळी

दिवाळी साठी प्रत्येक घरी बनवला जाणारा पदार्थ म्हणजे शंकरपाळ्या. शंकरपाळ्या वेगवेगळ्या प्रकारे बनवल्या जातात पण इथे मी साधी सोपी पद्धत वापरून छान खुसखुशीत शंकरपाळ्या कश्या बनवायच्या त्याची रेसिपी तुमच्या सोबत शेअर केली आहे.




साहित्य :-
५०० ग्रॅम मैदा
३५० ग्रॅम पिठीसाखर
१०० ग्रॅम बारीक रवा
१०० ग्रॅम डालडा / तूप
२ चमचे वेलची जायफळ पावडर
पाणी
तेल ( तळण्यासाठी ) 




कृती :-
१) बारीक रवा भाजून घ्या.
२) एक परात किंवा बाउल घ्या त्यामध्ये मैदा, पिठीसाखर,  ( मैदा आणि पिठीसाखर चालून घ्या. ) भाजून घेतलेला बारीक रवा, वेलची जायफळ पावडर, थोडेसे मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
३) मग त्या मध्ये डालडा किंवा तूप गरम करून घाला आणि मिश्रण चमच्याने मिक्स करून घ्या, मिश्रण थोडे थंड झाल्यावर हाताने मिक्स करून घ्या.
४) आता त्यात पाणी किंवा दुधाचा वापर करून मिश्रणचा गोळा बनवून घ्या. ( ज्याप्रमाणे आपण चपातीचे पिठ मळतो तसे )
५) गोळा मळून झाल्यावर एक तास बाजूला पिठ मुरत ठेवून द्या.
६) १ तासानंतर पिठाचा गोळा परत ५ मिनिटे चांगला मळून घ्या.
७) पिठाचे गोळे करून लाटून घ्या. ( लाटलेली पोळी जास्त पातळ किंवा जास्त जाड नसावी ) 
८) मग कृती मध्ये दाखवल्या प्रमाणे त्याला शंकरपाळ्या चा  आकार द्या.
९) गॅस चालू करा आणि कढई गरम करायला ठेवा. कढई गरम झाल्यावर त्यात तेल किंवा तूप घाला. तेल किंवा तूप मध्यम आचेवर गरम करून घ्या. तेल गरम झाल्यावर गॅस बारीक करुन शंकरपाळ्या तळून घ्या .
१०) दिवाळी साठी किंवा इतर वेळी सुध्या खाता येतील अश्या मैद्याच्या गोड खुसखुशीत शंकरपाळ्या तयार आहेत.



Sweet Shankarpali of Maidya

Every homemade dish for Diwali is Shankarpalya.  Shankarpalya is made in different ways but here I have shared with you the recipe of how to make nice crispy Shankarpalya using a simple method.

Ingredients : -
500 grams of fine flour
350 grams of powdered sugar
100 gms of fine semolina
100 gms Dalda / Ghee
2 tablespoons cardamom nutmeg powder
Water
Oil (for frying)

Method : -
1) Roast fine semolina.
2) In a big plate or bowl, add fine flour, powdered sugar, (Filtered fine flour and powdered sugar.) Add finely roasted semolina, cardamom nutmeg powder, a little salt and mix well.
3) Then add heat dalda or ghee in it and mix the mixture with a spoon. When the mixture cools down, mix it by hand.
4) Now make a mixture using water or milk.  (Just like we get chapati flour)
5) After kneading, keep the flour aside for one hour.
6) After 1 hour, knead the dough again for 5 minutes.
7) Roll the dough into balls.  (The rolling pin should not be too thin or too thick)
8) Then shape it as Shankarpalya as shown in the recipe.
9) Turn on the heat and keep the pan hot.  Once the pan is hot, add oil or ghee.  Heat oil or ghee over medium heat.  When the oil is hot, reduce the heat and fry the Shankarpala.
10) Sweet crispy Shankarpalas are ready for Diwali or at other times.
 
थोडे नवीन जरा जुने