Recipe In English
Mayonnaise Masala Pav
If you know the recipe that will be prepared immediately if you get hungry in a hurry, it can be done immediately. One of the simplest recipes I am sharing with you is mayonnaise Masala Pav.
There is a simple instant recipe that kids will love.
Ingredients : -
- 1 pav ladi
- 2 medium sized finely chopped onions
- 2 medium sized finely chopped tomatoes
- 1 medium sized finely chopped green capsicum
- Finely chopped coriander leaves
- 2 tablespoons mayonnaise
- 1/2 tsp all garlic paste
- 1 tbsp Pav Bhaji Masala
- 1 tablespoon turmeric
- 1 tablespoon red chili powder
- Salt
- Oil
- Amul Butter
Method: -
1) Turn on the heat and keep the pan hot. When the pan is hot, add oil and butter in equal proportions.2) Once oil and butter are hot, add finely chopped onion and saute till it changes color.
3) After frying onion, add finely chopped tomato, green chilli, ginger-garlic paste and mix well.
4) Then add red chili powder, turmeric powder, salt (to taste), pav bhaji masala and mix them well.
5) Add finely chopped coriander leaves and add a little water on top.
6) Cover and cook for 5 minutes.
7) After 5 minutes of cooking, add veg mayonnaise and mix everything well.
8) Then set aside the mayonnaise masala in the pan, add butter on one side and cut all the pav from the pav and fry (as shown in the video) and turn off the heat.
9) Fill mayonnaise masala in roasted pav and serve hot.
Recipe In Marathi
मियोनिझ मसाला पाव
घाईगडबडीत भूक लागली की लगेच तयार होणारी रेसिपी माहीत असेल तर लगेच करता येते. झटपट तयार होणाऱ्या खूप रेसिपी आहेत अशीच एक साधी सोपी रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करत आहे ती म्हणजे मियोनिज मसाला पाव.
साधी सोपी झटपट तयार होणारी टेस्टी लहान मुलांना आवडेल अशी रेसिपी आहे.
साहित्य:-
- १ पाव लादी
- २ मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे
- २ मध्यम आकाराचे बारीक चिरलेले टोमॅटो
- १ मध्यम आकाराची बारीक चिरलेली शिमला मिरची
- बारीक चिरलेली कोथिंबीर
- २ चमचे मियोनिझ (mayonnaise)
- १/२ चमचा आल लसूण पेस्ट
- १ चमचा पाव भाजी मसाला
- १ चमचा हळद
- १ चमचा लाल तिखट
- मीठ
- तेल
- अमूल बटर
कृती :-
१) गॅस चालू करा आणि त्यावर पॅन गरम करायला ठेवा. पॅन गरम झाल्यावर त्यात तेल आणि बटर समप्रमाणात घाला.
२) तेल आणि बटर गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घाला आणि रंग बदलेपर्यंत चांगला परतून घ्या.
३) कांदा परतून झाल्यावर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो, सिमला मिरची, आल लसूण पेस्ट टाकून एकत्र करून घ्या.
४) मग त्यात लाल तिखट, हळद, मीठ (चवीनुसार), पाव भाजी मसाला घाला आणि मिक्स करून घ्या.
५) बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि वरून थोड्या प्रमाणात पाणी घालून मिश्रण एकजीव करा.
५) झाकण ठेवून ५ मिनिटे भाजी शिजवून घ्या.
६) ५ मिनिटांनी भाजी शिजल्यावर त्यात व्हेज मियोनिज घाला आणि एकजीव करा.
७) मग भाजी पॅन मध्येच बाजूला करून एका साइडला बटर घाला आणि सगळे पाव मधून कट करून भाजून घ्या ( व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे) आणि गॅस बंद करा.
८) भाजून घेतलेल्या पाव मध्ये भाजी भरून घ्या आणि गरमागरम सर्व्ह करा.